J.R.D TATA Death Anniversary : टाटांच्या साधेपणामूळे ‘या’ सुपरस्टारचा विमान प्रवासात माज उतरला!

टाटा उद्योगसमूहातील अनेक नव्या उद्योगांचा पाया ‘जेआरडीं’नी रोवला
J.R.D TATA Death Anniversary : टाटांच्या साधेपणामूळे ‘या’ सुपरस्टारचा विमान प्रवासात माज उतरला!

J.R.D TATA Death Anniversary :  भारताची औद्योगिक पायाभरणी करणाऱ्या उद्योगपतींमध्ये जहांगीर रतनजी दादाभाई यांचे नाव सर्वोच्च आहे. ही व्यक्ती जेवढी प्रसिद्ध असते तेवढीच तिच्या साधेपणाचे किस्से प्रसिद्ध आहेत. रतन टाटा आणि दिवंगत अभिनेते दिलीप कूमार यांचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. त्याबद्दलच आज जाणून घेऊया.

जहांगीर रतनजी दादाभाई टाटा उर्फ जे.आर.डी. टाटा हे भारतीय उद्योजक होते. भारतातील पोलाद, अभियांत्रिकी, हॉटेल्स, विमान आणि इतर उद्योगांच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. उद्योगातील बापमाणूस जहांगीर टाटा यांचा जन्म २९ जुलै १९०४ रोजी पॅरिसमध्ये झाला. उद्योगपती रतनजी टाटा हे त्यांचे वडील आणि त्यांच्या आईचे नाव सुझान ब्रीअरे होते.

 फ्रान्स, लंडन, जपान आणि भारत या देशात त्यांचे शिक्षण झाले. १९२५ मध्ये त्यांनी ‘टाटा सन्स’मध्ये बिनपगारी अॅप्रेंटिस म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. १९३८ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी ते ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष बनले होते. स्टील, रसायने, ऊर्जा, वीज, अभियांत्रिकी आणि आतिथ्यशीलता या क्षेत्रात त्यांना अधिक रस होता. त्यामुळे या क्षेत्रातील अनेक उद्योगांचा पाया त्यांनी घातला.

 जे. आर. डी. टाटा हे देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते. टाटा उद्योगसमूहातील अनेक नव्या उद्योगांचा पाया ‘जेआरडीं’नी घातला. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टायटन इंडस्ट्रीज, टाटा टी, व्होल्टास आणि देशातील पहिली विमान कंपनी एअर इंडिया यांचा समावेश आहे. जेआरडी यांच्या अध्यक्षतेखाली टाटा समूहाने आपली उलाढाल १०० दशलक्ष अमेरिकी डॉलरवरून पाच अब्ज डॉलर्सच्या पुढे नेली.

रतनजी टाटा हे किती साधे व्यक्तीमत्व होते. याबद्दल दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दिलीप कूमार यांनी एक आठवण त्यांच्या बायोग्राफीमध्ये लिहीली आहे. दिलीप कूमार म्हणतात की, मी माझ्या करिअरच्या उच्च शिखरावर होतो. तेव्हाची ही आठवण आहे. एकदा मी विमानात प्रवास करत होतो. माझ्या शेजारी एक व्यक्ती बसली होती. त्या व्यक्तीने सामान्य शर्ट आणि पँट घातली होती.

ती व्यक्ती दिसायला अगदी सामान्य कुटुंबातील पण सुशिक्षित वाटत होती. सुपरस्टार दिलीप कूमार आपल्या विमानात आहेत हे समजल्यावर सर्व प्रवासी माझ्याकडे पाहून स्मितहास्य देत होते. पण, माझ्या बाजूला बसलेल्या त्या व्यक्तीने माझ्याकडे पाहिलेही नाही. ते निवांतपणे वर्तमानपत्र वाचत खिडकीतून बाहेर बघत होते.

एअर हॉस्टेसने चहा आल्यावर त्या व्यक्तीने हळूवारपणे कप उचलला. त्यांनी असे मला दुर्लक्षित करणे विचित्र वाटले, म्हणून मी त्याच्याशी बोलणे सुरू केले. आम्ही बोलू लागलो आणि काही वेळातच मी “सिनेमा” बद्दल बोलू लागलो. मी म्हणालो,  तूम्ही चित्रपट बघता का?, ते म्हणाले, कधीतरी. मी शेवटचा चित्रपट वर्षभरापूर्वी पाहिला होता.

त्यावर मी म्हणालो, मी पण चित्रपटात काम करतो. त्यावर त्या व्यक्तीने विचारले की, हा ठीक आहे. त्यावर तू चित्रपटात काय काम करतोस? , असेही त्याने मला विचारले. मी म्हणालो,  मी एक अभिनेता आहे. तो व्यक्ती म्हणाला  खूप छान. विमानातून उतरल्यावर मी हात हलवले आणि म्हणालो, तुमच्यासोबत प्रवास करून छान वाटले. तसे माझे नाव दिलीप कुमार आहे. ते म्हणाले "धन्यवाद. माझे नाव जे. आर. डी टाटा आहे. इकते साधे होते ते.

रतन टाटा दोराबजी टाटा ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली १९४१मध्ये टाटा मेमोरिअल सेंटर हे कर्करोगावर उपचार, संशोधन करणारे आशियातील पहिले रुग्णालय उभे राहिले.  १९४५मध्ये टाटा मोटर्सची स्थापनाही त्यांनी केली. १९३२मध्ये त्यांनी टाटा एअरलाइन्स ही स्वतःची विमान कंपनी स्थापन केली. नंतर तिचे राष्ट्रीयीकरण करून ती एअर इंडिया झाली.

‘जेआरडी’ २५ वर्षे या कंपनीचे अध्यक्ष होते. त्यांना मानद एअर कमोडोर पद देण्यात आले होते. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले होते. १९५५मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. या महान द्रष्ट्या उद्योजकाचा १९९३मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी २९ नोव्हेंबर १९९३ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com