न्यायाधीशांच्या १७ वर्षांच्या लेकानं मर्सिडीज चालवत दुचाकीला दिली धडक, एकाचा मृत्यू

Mercedes Crash in Kerala न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलानेच मर्सिडीज कार चालवत दुचाकीला धडक दिली. या धडकेत एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.
Mercedes Crash in Kerala

Mercedes Crash in Kerala

Esakal

Updated on: 

न्यायाधीशाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात मर्सिडीज कार चालवत दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. केरळच्या एर्नाकुलम इथं रविवारी पहाटे हा अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं वय ५४ वर्षे असं आहे. न्यायाधीशाच्या मुलाकडूनच घडलेल्या या अपघाताची चर्चा आता होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com