Justice Abhijeet Gagopadhyay: सकाळी दिला हायकोर्टाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा, दुपारी भाजपत प्रवेशाची केली घोषणा

लोकसभा निवडणुकीचा पारा आता चांगलाच चढायला लागला आहे.
Justice Abhijeet Gagopadhyay
Justice Abhijeet Gagopadhyay

Justice Abhijeet Gagopadhyay: लोकसभा निवडणुकीचा पारा आता चांगलाच चढायला लागला आहे. त्यामुळं अनेक राजकीय मंडळींचा पक्षांतराचा कार्यक्रमही सुरु होईल. पण यामध्ये एक अजबच पक्ष प्रवेश घडून येणार आहे. त्यानुसार, कलकत्ता हायकोर्टाचे न्यायमूर्ती ज्यांनी आज सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर दुपारी आपण आता भाजपत प्रवेश करणार आहोत असं जाहीरही केलं. आपल्या भाजप प्रवेशाची तारीखही त्यांनी जाहीर केली आहे. (Justice Abhijeet Gagopadhyay resigned as High Court judge in morning then announced to joined BJP in afternoon)

Justice Abhijeet Gagopadhyay
Maharashtra Govt: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 85 कोटींच्या देणार जाहिराती; निधीला मिळाली मंजुरी

अभिजीत गंगोपाध्याय असं या न्यायमूर्तींचं नाव असून त्यांनी मंगळवार, ५ मार्च २०२४ रोजी सकाळी हायकोर्टात पोहोचले आणि त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. जस्टिस गंगोपाध्याय यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडं राजीनामा पोहोचवला आहे. तसेच त्याची कॉपी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि कलकत्ता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश टीएस शिवज्ञानम यांना पाठवली आहे. (Marathi Tajya Batmya)

Justice Abhijeet Gagopadhyay
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची घोषणा 14 किंवा 15 मार्चला होणार? 7 टप्प्यात पार पडणार मतदान

दरम्यान, एक दिवस आधीच म्हणजे ४ मार्च २०२४ रोजी न्या. अभिजीत गंगोपाध्याय यांनी म्हटलं होतं की, आपण न्यायमूर्ती म्हणून आपलं काम पूर्ण केलं आहे. काही वकिलांनी त्यांना न्यायमूर्तीपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा आग्रह धरला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com