esakal | Justice for ayesha: आयेशाचा पती आरिफ अटकेत; मोबाईल लोकेशनमुळे सापडला जाळ्यात

बोलून बातमी शोधा

aayesha}

अहमदाबादच्या साबरमती नदीमध्ये तीन दिवसांपूर्वी उडी मारुन आत्महत्या करणाऱ्या 23 वर्षीय आयेशाच्या पतीला राजस्थानच्या पालीमधून सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे

Justice for ayesha: आयेशाचा पती आरिफ अटकेत; मोबाईल लोकेशनमुळे सापडला जाळ्यात
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- अहमदाबादच्या साबरमती नदीमध्ये तीन दिवसांपूर्वी उडी मारुन आत्महत्या करणाऱ्या 23 वर्षीय आयेशाच्या पतीला राजस्थानच्या पालीमधून सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. आयेशाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता. शिवाय तिने आपल्या आई-वडिलांसोबत बोलल्याचा शेवटचा ऑडिओही समोर आला होता. ज्यात आयेशाने पतीवर शोषण केल्याचा आरोप केला होता. संबंधित व्हिडिओ आणि ऑडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आयेशाच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण तिच्या बोलण्यातून तिच्या अंतकरणात असलेलं अफाट दु:ख दिसत होतं. व्हिडिओनंतर आयेशाने लगेच आत्महत्या केली होती. या घटनेमुळे अनेकांना सुन्न केलं. त्यामुळे आयेशाच्या पतीविरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप होता. आयेशाला न्याय मिळावा अशी मागणी होत होती. अखेर तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

लग्नाच्या एका कार्यक्रमातून पळाला होता आरिफ

आयेशाचा पती आरिफ राजस्थानच्या जालौरचा रहिवाशी आहे. शनिवारी आयेशाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर गुजरात पोलिसांनी जालौरमध्ये आरिफचे घर गाठलं. आरिफच्या कुटुंबीयांनी सांगितलं की तो एका लग्नासाठी गेला होता, तेथून तो बेपत्ता आहे. यानंतर मोबाईल लोकेशनच्या साहाय्याने आरिफला सोमवारी रात्री पालीमधून अटक करण्यात आली.

पक्ष फुलवण्यासाठी राहुल-प्रियांका गांधींनी शोधला नवा 'फॉर्म्युला'

आयशा अहमदाबादच्या रिलीफ रोडवर असणाऱ्या एसवी कॉमर्स कॉलेजमधून इकोनॉमिक्समध्ये एमए करत होती. शिवाय एका प्रायवेट कंपनीत काम करत होती. तिचं लग्न आरिफसोबत 6 जूलै 2018 मध्ये झालं होतं. 10 मार्चपासून आयेशा आपल्या माहेरी राहात होती. तिने आरिफवर छळ केल्याचा आरोप केलाय. ती आपल्या पतीच्या त्रासाला कंटाळली होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या आई वडिलांना फोन केला होता. 

विराटची 100 मिलीयन क्लबमध्ये एन्ट्री; पहा कोणत्या फोटोंमुळे केला विक्रम

आयेशाला उपाशी ठेवायचा आरिफ 

आयेशाचे वडील लियाकत अली खान यांनी सांगितलं की, माझी मुलगी हसतमुख होती. पण लग्नानंतर हुंड्यावरुन तिचं जीवन नर्क बनलं. एकदा तर तिच्या सासरच्यांनी आयेशाला तीन दिवस उपाशी ठेवलं होतं. ती मला फोन करुन अडचण सांगायची, म्हणून आरीफने तिचा मोबाईलही काढून घेतला होता. आयेशा शेजाऱ्यांच्या मोबाईलमधून लपूनछपून आई-वडिलांना फोन करायची. तिला देण्यात येणाऱ्या त्रासाबद्दल सांगायची. लियाकत अली यांनी आयेशाला घरी आणलं होतं. तसेच आयेशाच्या पती, सासू-सासऱ्यांविरोधात कौटुंबीक हिंसेंप्रकरणी तक्रार दाखल केली होती.