
भारताच्या न्यायव्यवस्थेत एक ऐतिहासिक क्षण येत आहे! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे. ते १४ मे २०२५ रोजी पदाची शपथ घेतील. कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोशल मीडिया X वर ही घोषणा केली. ही नियुक्ती भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार करण्यात आली आहे.