Child Protection: मुलांचे संरक्षण करणे ही राष्ट्रीय जबाबदारी : न्या. सूर्यकांत
Child Rights India : बाललैंगिक अत्याचारग्रस्त मुलांना केवळ साक्षीदार न मानता, त्यांच्यावर दीर्घकालीन, संवेदनशील व सर्वांगीण काळजी घेण्याची गरज आहे, असे मत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मांडले.
हैदराबाद : “देशातील बालसंरक्षण व्यवस्था आजही कमकुवत अन् अपुरी आहे. गुन्ह्यातील पीडित मुलांकडे न्यायालयात फक्त साक्षीदार म्हणून पाहू नये. तर त्यांची दीर्घकाळ संवदेनशीलतेने सर्वंकष काळजी घ्यावी.