

Summary
पूर्वी विवाह आणि वारसा धार्मिक व तात्विक विचारांनी नियंत्रित केले जात होते.
स्वातंत्र्यानंतर संसद आणि न्यायपालिकेने कुटुंब कायद्यात सुधारणा करून महिलांच्या हक्कांना बळ दिले.
विवाह नोंदणी आणि महिलांना भरपाई, वारसा व घराचा अधिकार देणारे कायदे आज लागू आहेत.
विवाह संस्थेचा वापर प्राचीन काळापासून केवळ महिलांना गुलाम बनवण्यासाठी केला जात आहे. प्रत्येक युगात आणि प्रत्येक संस्कृतीत महिलांना गुलाम करण्यासाठी याचा शस्त्र म्हणून केला वापर होतोय, पण आता कायदेशीर आणि सामाजिक सुधारणांद्वारे आज विवाह व्यवस्थेत समानतेची भावना विकसित होत आहे.परस्पर आदर आणि संवैधानिक मूल्यांवर आधारित समानतेची भावना उदयास येऊ लागली आहे. असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.