
नवी दिल्ली: अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्यासाठी १४६ खासदारांनी स्वाक्षरी केलेला प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वीकारला आहे. न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीही स्थापन करण्यात आल्याची घोषणा ओम बिर्ला यांनी मंगळवारी केली.