
एक धक्कादायक प्रेमकरणाचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे कारनामे ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत. हा तरुण १८ वर्षांचा होण्यास अवघ्या काही महिनेच उरले असताना त्याचे कारनामे समोर आले आहेत. आरोपी तरुण अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून, त्यांचे ब्रेनवॉश करून आणि त्यांना त्यांच्याच घरात चोरी करण्यास करत असे.
या तरुणाची पद्धत अगदी सोपी पण प्रभावी होती. तो एका जीवघेण्या आजाराने ग्रस्त असल्याची कहाणी रचायचा, मुलीचा विश्वास आणि सहानुभूती मिळवायचा आणि नंतर तिचे शोषण करायचा आणि घरात चोरी करायलाही भाग पाडायचा. दिल्लीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.