
Youtuber Jyoti Malhotra: पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यासंबंधीच्या कनेक्शन संदर्भात सध्या ज्योती मल्होत्रा ही युट्यूबर महिला चर्चेत आहे. गेल्या काही दिवासांपासून तिचं पाकिस्तानशी कनेक्शन असल्याची चर्चा सुरु आहे, यासंदर्भात अनेक बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये भारतीय सैन्यदलांची संवेदनशील माहिती तीनं पाकिस्तानला पुरवल्याचा अत्यंत गंभीर आरोपांचाही समावेश आहे.
पण आता याबाबत हरयाणातील हिस्सारचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी ज्योतीवर सुरु असलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. संवेदनशील माहिती शस्त्रू राष्ट्राला पुरवल्याच्या आरोपांबाबत ज्योती मल्होत्राची चौकशी सुरु आहे. परंतू अद्याप तसे कुठलेही पुरावे हाती आलेले नाहीत, तसंच तिच्याबाबत अनेक फेकन्यूज पसरल्या असल्याचंही हिस्सार पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.