Jyoti Malhotra Mentions BJP While Entering Pakistan : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राची सध्या हिसार पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ज्योती आणि पाकिस्तानी एजंट यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट्सही उघड झाल्या आहेत. विशेष म्हणजे, ज्योतीचे नाव काही राजकीय पक्षांशी जोडले जात आहे, आणि याच दरम्यान तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.