
पाटणा: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी हरियानाची यू-ट्यूबर ज्योती मल्होत्राचे ‘बिहार कनेक्शन’ समोर आले आहे. ज्योती भागलपूरमधील सुलतानगंज येथे चार वेळा येऊन गेली होती, असे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. याशिवाय ती देवघर आणि बासुकीनाथ येथेही काही काळ वास्तव्यास होती, असेही पोलिस सूत्रांकडून समजते.