VIDEO : व्यासपीठावरच मंत्र्याचं नितीन गडकरींसमोर लोटांगण; असं नेमकं काय घडलं?

'त्यांचा अनोखा अंदाज पाहून मंत्री नितीन गडकरी यांनाही हसू आवरलं नाही.'
Nitin Gadkari News
Nitin Gadkari Newsesakal
Summary

'त्यांचा अनोखा अंदाज पाहून मंत्री नितीन गडकरी यांनाही हसू आवरलं नाही.'

Nitin Gadkari News : केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) कालपासून मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. इथं एका कार्यक्रमात शिवराज सिंह चौहान सरकारमधील एका मंत्र्यानं व्यासपीठावरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना नमस्कार करत दंडवत घातला. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, राज्याच्या मंत्र्यानं नितीन गडकरींसमोर स्टेजवरच दंडवत प्रणाम केला. त्यांचा हा अनोखा अंदाज पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही हसू आवरलं नाही. ग्वाल्हेरमध्ये 1100 कोटींहून अधिक रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यामध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) ग्वाल्हेरला पोहोचले होते. सर्व पाहुणे स्टेजवर होते.

Nitin Gadkari News
NCP : निवडणुका आल्या की, मी कायम सावध असतो; असं का म्हणाले राष्ट्रवादीचे आमदार?

डोकं जमिनीवर टेकवून नमस्कार

यावेळी व्यासपीठावर ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर (Pradyuman Singh Tomar) बोलत होते. मग, कृतज्ञता व्यक्त करत ते पाहुण्यांसमोर पोहोचले आणि डोकं जमिनीवर टेकवून नमस्कार केला. हे दृश्य पाहून गडकरींसह सर्वांना हसू फुटलं. या कार्यक्रमात स्थानिक आमदार व राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांचं वेगळं रूप पाहायला मिळालं. शहराला द्रुतगती महामार्गाची भेट मिळाल्याबद्दल ऊर्जा मंत्री प्रधुम्न सिंह तोमर यांनी सर्वांसमोर नितीन गडकरींना दंडवत घातलं. त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ग्वाल्हेर-चंबळ झोनला 1128 कोटी रुपये खर्चून तयार होत असलेल्या सात रस्ते प्रकल्पांची भेट मिळणार आहे. गडकरींच्या हस्ते 222 किलोमीटर लांबीच्या प्रमुख रस्त्यांची पायाभरणी नुकतीच करण्यात आली.

Nitin Gadkari News
PM Modi Birthday : 8 वर्षात मोदींनी घेतले 'हे' 8 मोठे निर्णय; जाणून घ्या सर्वसामान्यांवर काय झाला परिणाम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com