esakal | काँग्रेसला झटका; ज्योतिरादित्य शिंदेनी दिला मोदी सरकारला पाठिंबा
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसला झटका; ज्योतिरादित्य शिंदेनी दिला मोदी सरकारला पाठिंबा

कलम 370 रद्द करण्याच्या विधेयकांवरून काँग्रेसला आता घरचाच आहेर मिळाला आहे. काँग्रेस अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असणारे मध्यप्रदेश काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. चांगल्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाचे समर्थन करायला काय हरकत आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसला झटका; ज्योतिरादित्य शिंदेनी दिला मोदी सरकारला पाठिंबा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कलम 370 रद्द करण्याच्या विधेयकांवरून काँग्रेसला आता घरचाच आहेर मिळाला आहे. काँग्रेस अध्यक्ष  पदाच्या शर्यतीत असणारे  मध्यप्रदेश काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. चांगल्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाचे समर्थन करायला काय हरकत आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन देणे हा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे. कलम 370च्या मुद्यांवर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. हा निर्णय घेताना सर्वाना विचारात घ्यायला हवे होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
 


केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यावरुन, काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असतानाच राज्यसभेपाठोपाठ आज कलम 370 रद्द करण्याबातचे विधेयक लोकसभेतही मंजूर करण्यात आले. 366 विरुद्ध 66 अशा मतांनी मंजूर करण्यात आले.

loading image