

Minor Girl Sexually Assaulted in Kutch, Parents Arrested
कच्छ : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील अंजार परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा, तर आईवर या प्रकारादरम्यान तिचे नग्न फोटो काढल्याचा गंभीर आरोप केला आहे. एका मुलाशी फोनवर बोलल्याच्या रागातून आई-वडिलांनी तिला घरात डांबून ठेवले, अन्न-पाणी दिले नाही तसेच मारहाण केल्याचेही मुलीने तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या आई-वडिलांविरोधात पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.