Kadasiddheshwar Swami
esakal
जत तालुक्यातील वादग्रस्त भाषणानंतर स्वामींवर दोन महिन्यांची प्रवेशबंदी
जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आदेश; पोलिस अहवालावर आधारित निर्णय
कर्नाटकातील विविध भागांत आंदोलने उसळली
बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठाचे श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांना दोन महिन्यांसाठी कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यामध्ये प्रवेशबंदी (Kadasiddheshwar Swami Entry Ban in Bijapur) घालण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. आनंद यांनी गुरुवारी (ता. १६) जारी केला. धार्मिक भावना भडकवणारी आणि समाजात असहिष्णुता निर्माण करणारी वक्तव्ये केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला. यासंदर्भात काडसिद्धेश्वर स्वामी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी ‘या संदर्भात आपल्याला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही’, असे सांगितले.