भारतात २०४७ पर्यंत प्रत्येक मूल सुरक्षित, शिक्षित असेल; कैलाश सत्यार्थींना विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kailash Satyarthi said that by 2047, every child in India will be safe and educated

'भारतात २०४७ पर्यंत प्रत्येक मूल सुरक्षित, शिक्षित असेल'

बालमजुरीच्या समस्येवर मात करण्यासाठी भारताने मागील काही वर्षांत अनेक प्रशंसनीय पावले उचलली आहेत. याचेच फळ म्हणून २०४७ पर्यंत देशातील प्रत्येक मूल सुरक्षित आणि शिक्षित होईल, असा विश्वास नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी (Kailash Satyarthi) यांनी व्यक्त केला. भारत २०४७ मध्ये स्वातंत्र्याचा १०० वा वर्धापन दिन साजरा करणार आहे, हे विशेष... (Kailash Satyarthi said that by 2047, every child in India will be safe and educated)

भारतातील (India) बालमजुरी संपवण्यासाठी सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. यासाठी सरकारला समाज आणि खाजगी क्षेत्राच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल. भारतातील प्रत्येक मुलाला स्वातंत्र्य, सुरक्षितता (safe), शिक्षण (educated) आणि सर्व प्रकारच्या संधी दिल्या पाहिजेत. मला खात्री आहे की ते २०४७च्या अगोदर पूर्ण होईल, असेही कैलाश सत्यार्थी (Kailash Satyarthi) मुलाखतीत म्हणाले.

हेही वाचा: दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् आजोबा, नातवाला चिरडले; सून गंभीर जखमी

सत्यार्थी हे शांतता कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनातील सदस्यांना, थिंक टँकचे सदस्य आणि कायदेतज्ज्ञांना भेटण्यासाठी अमेरिकेत आहेत. एक प्रकारे मी समाजातील शेवटच्या माणसाबद्दल बोलतो तेव्हा माझा दृष्टिकोन महात्मा गांधींपासून प्रेरित आहे. मला आशा आहे की भारत हे पूर्ण करू शकेल. २०४७ पर्यंत वाट पाहावी लागणार नाही. हे त्या अगोदरच होईल, असेही कैलाश सत्यार्थी (Kailash Satyarthi) म्हणाले.

Web Title: Kailash Satyarthi Said That By 2047 Every Child In India Will Be Safe And Educated

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Indiaeducation
go to top