कमल हसन यांना आणखी एक धक्का; वरिष्ठ नेत्यांचा पक्षाला रामराम

कमल हसन यांना आणखी एक धक्का; वरिष्ठ नेत्यांचा पक्षाला रामराम

चेन्नई : अभिनयातून राजकीय पडद्यावर आपली अदाकारी सादर करण्यासाठी फेब्रुवारी 2018 मध्ये कमल हसन (Kamal Haasan) यांनी 'मक्कल निधी मय्यम' (MNM) नावाचा पक्ष स्थापन केला ज्याचा अर्थ होतो 'जन न्याय केंद्र'. तमिळनाडू राज्याच्या या आधीच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे तामिळनाडूच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. जयललिता आणि करुणानिधी या अनेक वर्षांपासून तामिळनाडूच्या (Tamil Nadu) राजकारणाचा चेहरा ठरलेल्या या दोघांची जागा घेण्यास सध्या तरी कोणी तयार नव्हतं, अशा काळात कमल हसन यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र, त्यांचा पक्ष तमिळनाडूच्या राजकीय पटलावर काही विशेष कामगिरी करताना दिसत नाहीये. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वत: कमल हसन यांचा साउथ कोयंबतूर मतदारसंघातून पराभव झाला आहे. तर आता आणखी एक मोठा झटका त्यांच्या पक्षाला बसला आहे. (Kamal Haasan party MNM big Jolt Santhosh Babu Padma Priya Has Resigned )

कमल हसन यांना आणखी एक धक्का; वरिष्ठ नेत्यांचा पक्षाला रामराम
कमल हसन राजकीय पडद्यावरही ठरणार का सुपरहीट?

तमिळनाडूमध्ये कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यम (MNM) पक्षाच्या आणखी दोन नेत्यांनी वैयक्तिक कारण पुढे करत पक्षाला रामराम ठोकला आहे. यामध्ये वरिष्ठ नेता आणि माजी IAS संतोष बाबू यांचा देखील समावेश आहे. पक्षाचे महासचिव संतोष बाबू आणि राज्य सचिव पद्म प्रिया (Santhosh Babu, Padma Priya) यांनी पक्षाच्या पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

याआधी काही दिवसांपूर्वीच पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. आर महेंद्र यांनी राजीनामा दिला होता. यावेळी त्यांनी MNM मध्ये लोकशाहीचा अभाव असल्याचा आरोप केला होता. यावेळी संतोष बाबू यांनी ट्विटरवर म्हटलंय की मी जड अंत:करणाने सांगतो आहे की, मी आपल्या मक्कल निधी मय्यम पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझा हा निर्णय वैयक्तिक कारणांमुळे आहे. मी प्रेम आणि मित्रत्वासाठी कमल सर आणि आमच्या टीमचे आभार मानतो.

माजी अधिकारी राहिलेल्या बाबू यांनी 6 एप्रिल रोजी झालेल्या विधानसभा निवडणूकीत वेलचेरी जागेवरुन निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मदुरावोयालमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रिया यांनी देखील MNM पक्षांपासून फारकत घेतली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, मी खूप विचारांती MNM पक्षाच्या राज्य सचिव पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा वैयक्तीक कारणांमुळे राजीनामा देत आहे.

कमल हसन यांना आणखी एक धक्का; वरिष्ठ नेत्यांचा पक्षाला रामराम
लसींच्या तुटवड्यामुळे दोन डोसमधील अंतर वाढणार का?; काँग्रेसचा सवाल

कमल हसन यांच्या पक्षाचा कसा राहिलाय प्रवास?

2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदा उतरुन त्यांनी सक्रिय राजकारणात आपली प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र, या निवडणुकीत कमल हसन स्वत: उभे राहिले नव्हते. मात्र, या विधानसभेच्या निवडणुकीत ते स्वत: दक्षिण कोयंबतूर मतदारसंघात उभं राहिले आहेत. एमएनएमने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 142 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कमल हसन यांच्या नवख्या पक्षाने राज्यातील 3.72 टक्के व्होट शेअर घेतले होते. निवडणूक आयोगाने त्यांच्या पक्षाला 'टॉर्चलाईट' हे निवडणूक चिन्ह देऊ केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com