‘हिंदी’ ट्विटवरून अमित शहांचा कमल हसन यांनी घेतला समाचार

टीम ई-सकाळ
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

चेन्नई : गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी दिनाच्या निमित्ताने एक देश-एक भाषा अशी घोषणा दिली. या घोषणेला दक्षिण भारतातील राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे. डीएमकेचे नेते एमके स्टॅलिन यांनी त्या घोषणेला कडाडून विरोध केला होता.

चेन्नई : गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी दिनाच्या निमित्ताने एक देश-एक भाषा अशी घोषणा दिली. या घोषणेला दक्षिण भारतातील राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध होत आहे. डीएमकेचे नेते एमके स्टॅलिन यांनी त्या घोषणेला कडाडून विरोध केला होता. आता या वादात ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम (एमएनएम)चे अध्यक्ष कमल हसनने उडी घेतली आहे.

अमेरिकेतील ट्रकवर झळकले मोदीविरोधी बॅनर; पाहा व्हिडिओ

एकतेच्या मूलमंत्राला धक्का लावू नका
या संदर्भात कमल हसन यांनी ट्विट केले असून, भारत प्रजासत्ताक झाला तेव्हाच विविधतेत एकता असा मूलमंत्र दिला गेला होता. आता कोणत्याही शहा, सुलतान किंवा सम्राटने या मूलमंत्राला नाकारू नये, असे कमल हसन यांनी ट्विटरवर म्हटले आहे. एक देश, अनेक भाषा नावाचा व्हिडिओ कमल हसन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात कमल हसन यांनी म्हटले, की आम्ही प्रत्येक भाषेचा सन्मान करतो. मात्र आमची मातृभाषा तमीळच राहील. जलिकट्टूवर केवळ आंदोलनच झाले होते. मात्र भाषेची लढाई यापेक्षा मोठी असेल. अर्थात भारत किंवा तमिळनाडूला अशा लढाईची गरज नाही. देशभरात अभिमानाने बंगाली भाषेतील राष्ट्रगीत म्हटले जाते आणि हे सुरूच राहील. कारण; ज्यांनी हे लिहले आहे, त्यांनी प्रत्येक भाषा आणि संस्कृतीचा सन्मान केला. शेवटी कमल हसन यांनी "जय हिंद' अशी घोषणा देत व्हिडिओचा समारोप केला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसंदर्भात शरद पवारांची मोठी घोषणा; मनसे कुठंय?

काय म्हणाले होते अमित शहा?
दरम्यान, हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश-एक भाषा अशी घोषणा दिली होती. शहांनी म्हटले, की भारतात अनेक भाषा असून, प्रत्येक भाषेचे वेगळे महत्त्व आहे. मात्र संपूर्ण देशाची एकच भाषा असणे गरजेचे असून, या माध्यमातून भारताची जागतिक ओळख निर्माण होईल. आजघडीला सर्वांना एकसूत्रात बांधणारी कोणती भाषा असेल, तर ती हिंदी आहे. अमित शहांच्या या भाषणानंतर दक्षिण भारतातील राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. अण्णा द्रमुक पक्षाने हिंदी भाषा लादण्यावर आक्षेप घेतला. द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनीही शहांचे विचार आश्‍चर्यकारक असल्याचे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kamal haasan slams amit shah on hindi language remake twitter