Kamal Haasan : कन्नडचा जन्म तमीळमधूनच; कमल हसन यांच्या विधानाने कर्नाटकात वाद
Kannada Tamil Debate : ‘‘कन्नड भाषेचा उगम तमीळ भाषेतूनच झाला,’’ या कमल हसन यांच्या विधानामुळे कर्नाटकमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कर्नाटक रक्षण वेदिके व इतर संघटनांनी चित्रपटावर बंदी घालण्याचा इशारा दिला आहे.
चेन्नई : ‘‘कन्नड भाषेचा जन्म तमीळ भाषेतूनच झाला,’’ असे विधान ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी केले आहे. हसन यांचे हे विधान वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, कर्नाटकमध्ये कमल हसन यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.