कंगणा राणावत विरोधात तक्रार; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी | Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kangana ranaut

कंगणा राणावत विरोधात तक्रार; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांनी चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगणा राणावत (kangana ranaut) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. 1947 मध्ये भारताला मिळालेलं स्वातंत्र्य (Indian freedom) हे भीक होती, भारताला खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं असं वादग्रस्त विधान (Controversial statement) तिनंं एका न्युज चॅनलच्या कार्यक्रमात केलं होतं, तिच्या याच विधानावरुन तिच्याविरोधात मुंबई पोलिसांत (mumbai poice complaint) तक्रार दाखल करण्यात आलीये. तसंच तिला देशद्रोही (Traitor) घोषित करावं अशी मागणीही करण्यात आलीय.

हेही वाचा: बारावी परीक्षांचे बोगस वेळापत्रक व्हायरल

वक्तव्यावरुन अनेकांनी कंगणाला फटकारलं

विधान परिषदेच्या उपाध्यक्षा निलम गोऱ्हे यांनी कंगणाला चांगलंच फटकारलंय नुकताच पद्म सन्मान मिळाल्यानंतर कंगणानं अत्यंत बेजबाबदारपणे हे विधान करुन तेव्हाच्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केल्यानं तिचा निषेध करते असं त्यांनी म्हटलंय. या वक्तव्यानं कंगणानं स्वातंत्र्यसेैनिकांसोबतच स्वातंत्र्यलढ्याचाही अपमान केलाय त्यामुळं तिचा पद्म पुरस्कार काढून तत्काळ घ्यावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी आपण राष्ट्रपतींकडे करणार असल्याचंही निलम गोऱ्हे यांनी म्हटलंय. तसंच भाजपचे खासदार वरुण गांधी यांनीही कंगणाचा व्हिडीओ ट्विट करत अशा विचारांना वेडेपणा म्हणावा की देशद्रोह असा प्रश्न उपस्थित केलाय

याआधीही देशद्रोहाचा गुन्हा दाखल

2020 मध्ये समाजमाध्यमांद्वारे धार्मिक तेढ निर्माण करत असल्याच्या आरोपात कंगणा आणि तीची बहिण रंगोली यांच्यावर बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

loading image
go to top