बारावी परीक्षांचे बोगस वेळापत्रक व्हायरल | Education Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fake

बारावी परीक्षांचे बोगस वेळापत्रक व्हायरल

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाडून दहावी आणि बारावीची परीक्षा (SSC and HSC) ही ऑफलाईन (offline) पद्धतीनं घेण्यासाठी तयारी सुरू केलेली असतानाच सोशल मीडियावर (social media) बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रकच (Exam timetable viral) व्हायरल झाले आहे. यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम (student confusion) निर्माण झाला असल्याने याविषयी मंडळाने अशा बोगस आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर (fake timetable) विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.

हेही वाचा: नवी मुंबई : १५ नोव्हेंबरला कोविड योद्ध्यांच्या घरांची सोडत

दहावी-बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी मंडळाकडून तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी लवकरच वेळापत्रक जारी केले जाणार आहे. त्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बारावीच्या वेळापत्रकावर मंडळाकडून तातडीने भूमिका जाहीर करत त्यावर विश्वास ठेवू नये आवाहन मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना केले आहे.

loading image
go to top