
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रानौत यांना मोठा झटका दिला. बठिंडा येथील न्यायालयाने त्यांना मानहानीच्या खटल्यात पाठवलेले समन्स रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली. आता कंगनाला बठिंडा येथील न्यायिक दंडाधिकारी (प्रथम श्रेणी) समोर खटल्याचा सामना करावा लागणार आहे.