कंगना राणावत म्हणते, वीर दासवर कडक कारवाई करा | Kangana Ranaut Comment On Vir Das | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंगना राणावत
कंगना राणावत म्हणते, वीर दासवर कडक कारवाई करा

कंगना राणावत म्हणते, वीर दासवर कडक कारवाई करा

नवी दिल्ली : 'भारतात महिलांची दिवसा पूजा आणि रात्री गँगरेप' हे म्हणाऱ्या काॅमेडियन वीर दासवर (Comedian Vir Das) अभिनेत्री कंगना राणावत हिने टीका केली आहे. वीर दासविरुद्ध मोर्चा उघडताना कंगनाने त्याच्या या म्हणण्याला साॅफ्ट दहशतवाद म्हटले आहे. ती लिहिते की, हे एक अशा बिघडलेल्या भारतीय माणसाचे उदाहरण आहे, जो कोणत्याही गोष्टीत चांगला नाही. त्यामुळे तो आपल्यासारख्या लोकांमध्येच असे घाणेरडेपणा विकतो. तसेच तिने वीर दासविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. कंगना राणावत (Kangana Ranaut) नेहमी सामाजिक मुद्द्यांसाठी सोशल मीडियावर (Social Media) लिहित असलेल्या आपल्या वादग्रस्त मतांसाठी चर्चेत असते.

हेही वाचा: 'नेताजी आणि गांधी हिरो होते,जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले'

कंगना लिहिते, की जेव्हा तुम्ही भारतीय पुरुषांना गँगरेपिस्ट म्हणून जनरलाईज करता तेव्हा तुम्ही वंशवादाला प्रोत्साहन देता आणि जगात भारतीयांचे अपमान करता. पूर्ण वंशाला अशा प्रकारे टार्गेट करण्याचे क्रिएटिव्ह वर्क एक प्रकारे साॅफ्ट दहशतवाद आहे. अशा आरोपींविरुद्ध कडक कारवाई करायला हवी. सोमवारी वीर दासने आपल्या यूट्यूब चॅनलवर 'आय कम फ्राॅम टू इंडियाज' या कवितेचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्याने भारतातील अपप्रवृत्तीवर बोट ठेवले होते. तो पुढे म्हणतो की भारतात दिवसा लोक महिलांची पूजा करतात आणि रात्री गँगरेप करतात. अशी कविता अमेरिकेतील जाॅन एफ. केनेडी केंद्रात सादर केल्याने वीर दासवर टीका होत आहे. त्याच्याविरुद्ध देशातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

loading image
go to top