Kangana Ranaut: कंगना लोकसभा निवडणूक लढवणार? आवडीचा मतदारसंघही सांगितला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut

Kangana Ranaut: कंगना लोकसभा निवडणूक लढवणार? आवडीचा मतदारसंघही सांगितला

नवी दिल्लीः नेहमी या-ना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात असणारी अभिनेत्री कंगना रणौतने निवडणूक लढवण्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. शिवाय आवडीचा लोकसभा मतदारसंघदेखील सांगितला. तिच्या राजकीय प्रवेशासंदर्भातलं हे मोठं विधान ठरु शकतं.

२०२४मध्ये हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघामधून मला निवडणूक लढवायला आवडेल, असं कंगना म्हणाली. अनेक लोक आपल्याला राजकारणात येण्याविषयी विचारत असतात, असंही तिने सांगितलं.

एका चॅनेलला कंगनाने मुलाखत दिली. यावेळी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं तोंडभरुन कौतुक केलं. आपला कोणीच विरोधक नाही हे मोदींना चांगलं माहिती आहे. राहुल गांधीचा सामना हा राहुल गांधींशीच आहे. त्यामुळे मोदींना कणखर विरोधक नाही, असंही ती म्हणाली.

बॉलिवूडबद्दल कंगना म्हणाली की, सध्या बॉलिवूडमध्ये घराणेशाही आहे. मात्र हे फार काळ चालणार नाही. कारण लोक बदलत आहेत. प्रेक्षक जागरुक झाले तर ही घराणेशाही संपुष्टात यायला वेळ लागणार नाही.

सध्या हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यावरदेखील कंगनाने भूमिका मांडली. हिमाचल प्रदेशमध्ये आम आदमी पार्टीला फायदा होणार नाही, तिथले लोक स्वयंपूर्ण आहोत. त्यामुळे खोट्या भूलथापांना जनता बळी पडणार नसल्याचं कंगनाने सांगितलं.

वडील जय मोदी म्हणतात...

आमचं कुटुंब पूर्वी काँग्रेसी होतं. परंतु आता आम्ही २०१४पासून भाजपमय झालेलो आहेत. माझे वडील सकाळी उठून जय मोदी म्हणतात आणि सायंकाळी जय योगी म्हणतात. मोदी हे आमच्याच कुटुंबातील एक असल्याचं कंगनाने सांगितलं.