esakal | कंगना राणावत CM योगींच्या भेटीला! राजकारण की मनोरंजन? चर्चांना उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

Kangna Ranaut And Yogi Adityanath

कंगना राणावत CM योगींच्या भेटीला! राजकारण की मनोरंजन? चर्चांना उधाण

sakal_logo
By
सुधीर काकडे

अभिनेत्री कंगना ही तिच्या हटके स्वभावासाठी ओळखली जाते. गेल्या काही महिन्यांपासून कंगना भलतीच आक्रमक झाली आहे. तिनं भाजपशी साधलेली जवळीक सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. आता तिनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्याथ यांची भेट घेतल्यानं वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीमुळे ती भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यापूर्वी देखील कंगना पंजाबमधून निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर हिमाचल प्रदेशमधून लढणार असल्याचेही समोर आलं होतं. आता कंगनाच्या या भेटीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काहींचे म्हणणे आहे की, तिनं युपी मध्ये बॉलीवूडच्या धर्तीवर जे स्टूडिओ उभारले जाणार आहेत. त्यानिमित्तानं देखील तिने ही भेट घेतलेली असू शकते.

हेही वाचा: माझा अपमान झाल्याचे जगाने पाहिले - अमरिंदर सिंग

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात मोठी चित्रपट सृष्टी निर्माण करणार असल्याचे सांगितले होते.

loading image
go to top