
अरारिया : काँग्रेसच्या ‘पलायन रोको, नौकरी दो’ यात्रेमध्ये बिहारमधील अररिया जिल्ह्यात गोंधळ उडाला. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे (एनएसयूआय) प्रभारी असलेल्या कन्हैयाकुमार यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी त्यांच्या जवळ जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना कन्हैयाकुमार यांच्या खासगी सुरक्षारक्षकांनी धक्काबुकी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे कन्हैयाकुमार यात्रा अर्धवट टाकत माघारी परतले.