फरफटत नेणाऱ्या तरुणीसंदर्भात मोठी अपडेट: Kanjhawala Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kanjhawala Case

Kanjhawala Case: तरुणीला फरफटत नेणाऱ्या कारच्या मालकाला अटक

kanjhawala accident girl death दिल्लीतील कंझावाला येथे कारखाली आलेल्या अंजली सिंग या २० वर्षीय तरुणीला चालकाने १२ किलोमीटर फरपटत नेलं होतं. या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी मोठी कारवाई केली असून गाडी मालक आशुतोषला अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

कंझावाला येथे झालेल्या घटनेत अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना रोहिणी कोर्टातून चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिसांनी ५ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र या घटनेत ५ नव्हे तर ७ असल्याचा दिल्ली पोलिसांचा नवा दावा आहे. आशुतोष आणि अंकुश अशी दोन नवीन आरोपींची नावे आहेत.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी १ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजून ३३ मिनिटांनी रोहिणीतील सेक्टर १ मध्ये पोहोचले होते. यावेळी आशुतोषही तिथे उपस्थित होता. आरोपींनी त्यापूर्वीच फोन करून आशुतोषला अपघाताबाबत माहिती दिली होती. त्यामुळे त्याने आरोपींना पळून जाण्यासाठी ऑटोची व्यवस्था करून दिली होती.

काय आहे प्रकरण?

दिल्लीच्या कंझावालामध्ये रविवारी एका तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला होता. शरीराचे बरेचसे भाग फरफटत नेल्यानं तुटले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार ५ तरुण भरधाव वेगानं कार चालवत होते. त्यांनी संबंधित तरुणी स्कूटरवरुन जात असताना तिला धडक दिली. त्यानंतर तिला १० ते १२ किमीपर्यंत फरफटत नेलं. ज्यात तिचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: Kanjhwala Death Case: तरुणीला कारनं 12 किमी फरफटत नेण्याऱ्या घटनेत दिल्ली पोलिसांचा नवा खुलासा!

दिल्ली पोलिसांनी मृतदेह प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता काही अंतरावर तिची स्कूटर देखील आढळून आली. जी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. स्कूटीच्या नंबरप्लेटच्या मदतीनं तरुणीची ओळख पटवण्यात आली.

हेही वाचा: Delhi Crime : तरुणीला फरफटत नेलेली 'ती' कार कोणाची? दिल्ली पोलिसांच्या तपासाची दिशा ठरली

आरोपींना अटक करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्री अमित शाह यांनी जातीनं यात लक्ष घातलं आहे. त्यांनी पोलिसांना सविस्तर अहवाल देण्यास सांगितलं आहे.

टॅग्स :delhi