चंपा अशी ओळख असलेल्या लेखक चंद्रशेखर पाटील यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrashekhar Patil
चंपा अशी ओळख असलेल्या लेखक चंद्रशेखर पाटील यांचे निधन

चंपा अशी ओळख असलेल्या लेखक चंद्रशेखर पाटील यांचे निधन

प्रख्यात कन्नड कवी, नाटककार आणि कन्नड साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर पाटील (८३) यांचं आज सकाळी निधन झालं. बंगळुरूमधील कनकापुरा रोडवरील कोनानकुंटे क्रॉसजवळील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कन्नड साहित्यातील 'बंदया' शैलीतील अग्रगण्य आवाजांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे चंद्रशेखर पाटीला यांना लोक 'चंपा' असंही म्हणायचे. ( Kannada Writer Chandrashekar Patil also known as Champa passed away)

हेही वाचा: राज्यात आजपासून नवे निर्बंध, वाचा तुमच्या मनातील १७ प्रश्नांची उत्तरं

चंपा कन्नडच्या साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक चळवळींमध्ये एक अग्रस्थानी होते. १८ जून १९३९ रोजी जन्मलेले चंपा हावेरी जिल्हाच्या सावनूर तालुक्यातील रहिवासी आहे. साहित्यिक चंपा या लढवय्याचे आज सकाळी शहरातील कुंगनकुंटे येथील अस्त्र रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शहरातील येळचेना हल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव आणण्यात येणार आहे.

दरम्यान, त्यांच्यावर अंत्यसंस्कार बंगळुरूत होणार की हावेरीजवळील डोंबारामतूर येथे होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे अंत्यसंस्काराचा निर्णय अद्याप झालेला नाही, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Karnataka
loading image
go to top