Kannauj School Van Accident : उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. छिब्रामऊ परिसरातील ब्रह्मपूरजवळ एका डंपरनं मुलांनी भरलेल्या स्कूल व्हॅनला जोराची धडक दिली. या दुर्घटनेत व्हॅनमधील १४ विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी ५ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.