Petrol Pump Employee Killed Case
esakal
Petrol Pump Employee Killed Case : उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात एका अत्यंत धक्कादायक आणि निर्घृण हत्येने खळबळ उडाली आहे. ही घटना कानपूर आयुक्तालयातील डीसीपी (दक्षिण) कार्यालयापासून काही पावलांच्या अंतरावर असलेल्या निराला नगर रेल्वे ग्राउंड परिसरात घडली आहे. डीसीपी कार्यालयाजवळच पोलिस चौकी आणि नियमित रात्रीची गस्त असतानाही, मारेकऱ्यांनी निर्भयपणे आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही हत्या केल्याने पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.