घराला आग, मरेपर्यंत मायलेकीचा आक्रोश तरीही चालवला बुलडोजर; जळीतकांडाचा थरारक Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

घराला आग, मरेपर्यंत मायलेकीचा आक्रोश तरीही चालवला बुलडोजर; जळीतकांडाचा थरारक Video Viral

कानपूर : सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्यासमोरच मायलेकीचा होरपळून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तरप्रदेशातील कानपूर येथे ही घटना घडली असून या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या भीषण घटनेमुळे कानपूर हादरलं आहे.

अधिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कानपूरमधील मैथा तालुक्यातील मडौली गावात हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी ग्राम समाजाच्या जागेवर काही लोकांनी झोपड्या टाकून अतिक्रमण केलं होतं. हे अतिक्रमण हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तात अधिकारी पोहोचले होते.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

पोलिसांनी अतिक्रमण हटवण्यास सुरूवात केली, तर एका कुटुंबातील महिलेने याला विरोध केला होता. त्याचवेळी अधिकाऱ्यांनी घरावर बुलडोजर चालवला पण त्याआधी या घराला आग लागली होती. आग लागलेली असतानाही बुलडोजर चालवल्याने घरात असलेल्या मायलेकीचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

हे सर्व पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोरचं घडल्यानं हे प्रकरण प्रशासनाच्या चांगलचं अंगलट येण्याची शक्यता आहे. या घटनेमध्ये या दोघींना वाचवायला गेलेल्या एक पोलीस अधिकारी देखील आगीमध्ये होरपळला. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

टॅग्स :crimefiredeathVideoKanpur