इलेक्ट्रिक बसचा अपघात; ६ जणांचा मृत्यू, ९ जखमी | Electric Bus Accident in Kanpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric Bus Accident in Kanpur

अनियंत्रित झाल्यानंतर अनेक गाड्यांना चिरडत शेवटी एका चौकातील ट्रॅफिक बूथला धडकून डंपरला धडकल्यानंतर बस थांबली.

इलेक्ट्रिक बसचा अपघात; ६ जणांचा मृत्यू, ९ जखमी

कानपूरमध्ये इलेक्ट्रिक बसच्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. बसने अनेक वाहनांना धडक दिल्यानं मोठं नुकसानही झालं आहे. अनियंत्रित झाल्यानंतर अनेक गाड्यांना चिरडत शेवटी एका चौकातील ट्रॅफिक बूथला धडकून डंपरला धडकल्यानंतर बस थांबली. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी आहे. यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं.(Electric Bus Accident in Kanpur)

रविवारी रात्री उशिरा एक इलेक्ट्रिक बस वेगाने घंटाघर चौकातून टाटमिलच्या दिशेनं जात होती. पुलावरून पुढे जाताच चालकाने बस वळवली. त्यानंतर जे कोणी बसच्या आडवं येईल त्याला चिरडत तो सुटला. टाटमिल चौकात असलेल्या ट्राफिक बूथला धडकल्यानंतर समोरून येणाऱ्या डंपरला बसने धडक दिली. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ६ पैकी ४ जणांची ओळख पटली आहे.

हेही वाचा: दलित व्यक्तीचं अपहरण करुन मारहाण; मूत्र पिण्यासंही भाग पाडलं

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवम उर्फ शुभम सोनकर आणि त्याचा मित्र ट्विंकल उर्फ सुनिल सोनकर आणि रमेश यादव या तिघांना बसने धडक दिली. यात शिवम आणि सुनिल यांचा मृत्यू झाला. यांच्याशिवाय एक दुचाकीस्वार आणि ६० वर्षीय वृद्धाला या अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. इलेक्ट्रिक बसने एका कारला, दोन दुचाकींना, स्कूटी, टेम्पो आणि डंपरला धडक दिली.

अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून चालकाची माहिती मिळवली आहे. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने सध्या तपास केला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राथमिक तपासात बस चालकाची चूक असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

Web Title: Kanpur E Bus Accident 6 Died 9 Injured Yesterday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kanpur
go to top