
टक्कल पडलेल्या लोकांसाठी, केस परत मिळवणे हे एक स्वप्न असते. पण कधीकधी हे स्वप्न जीवावर देखील बेतते. उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील पंकी पॉवर प्लांटमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून काम करणाऱ्या एका इंजिनिअरच्या बाबतीत असेच काहीसे घडले. विनीत दुबे हा गोरखपूरचा रहिवासी होता आणि त्याने अलिकडेच एचबीटीआय कानपूर येथून पीएचडी पूर्ण केली होती.