Uttar Pradesh Fire Accident
A devastating fire broke out in a five-storey residential building in Kanpur, Uttar Pradeshesakal

Fire incident : पाच मजली इमारतीत भीषण आग, एकाच कुटुंबातील 6 जणांचा होरपळून मृत्यू

Fire incident : इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर बूट-चप्पल बनवण्याचा कारखाना आहे. पीडित कुटुंबातील लोक तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर राहतात. रविवारी त्यातील एका एका बूट कारखान्यात आग लागली. काही क्षणातच आगीने भयानक रूप धारण केले आणि संपूर्ण कंपनीत पसरली.
Published on

Fire Accident in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका पाच मजली इमारतीला भीषण आग लागली. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जण जिवंत जळाले तर आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आई-वडील आणि तीन मुलींचा समावेश आहे. इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर बूट-चप्पल बनवण्याचा कारखाना आहे. पीडित कुटुंबातील लोक तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर राहतात. रविवारी ही भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने भयानक रूप धारण केले आणि संपूर्ण इमारतीत पसरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com