Kanpur Married Woman Case
esakal
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात इन्स्टाग्रामवर (Instagram) ओळख झालेल्या प्रियकरासोबत राहत असलेल्या मानसी (वय २१) या विवाहित महिलेच्या हत्येप्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मानसीच्या मृत्यूपूर्वी रुग्णालयात दाखल असताना काढलेला एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये तिने आपल्या मृत्यूनंतर प्रियकर मनीष यादवला त्रास देऊ नये, अशी विनंती केल्याचे दिसते. मानसी गेल्या सहा महिन्यांपासून पतीचे घर सोडून मनीषसोबत राहत होती.