वर्गात मुलींची फ्री स्टाईल हाणामारी,एकमेकींच्या झिंज्या उपटत केली शिवीगाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school

वर्गात मुलींची फ्री स्टाईल हाणामारी,एकमेकींच्या झिंज्या उपटत केली शिवीगाळ

शाळकरी मुलींच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थिनी वर्गात एकमेकांशी जोरदार भांडत आहेत आणि एकमेकांचे केस पकडून मारहाण करताना दिसत आहेत. मुलींमध्ये झालेल्या या भांडणाचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर वापरकर्ते मज्जा घेत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ हा उत्तर प्रदेशातील कानपूरचा असल्याचे समजते. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकीत झाले आहेत. मात्र, हा व्हिडीओ कोणत्या शाळेचा आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

लोकांनी व्हिडीओ पाहून शाळेवर प्रश्न उपस्थित केला आहे. या व्हिडीओत एकमेकींना मारत आहे आणि शिव्या देखील देत आहेत. मुलींच्या कपड्या वरून समजत आहे की हा व्हिडीओ एका खाजगी शाळेतला आहे. मुलींनी घातलेली कपडे एका शाळेतील मुलींच्या ड्रेस सारखीच आहेत. हा व्हायरल होताच त्या शाळेचे संचालक आलोक मिश्रा यांनी हा व्हिडिओ त्यांच्या शाळेचा नसल्याचे सांगितले आहे.

Web Title: Kanpur School Girls Fight Video Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..