

Kanpur Zoo Maze
esakal
उत्तर प्रदेशातील कानपूर प्राणीसंग्रहालयात पर्यटकांना प्राण्यांच्या दर्शनासोबतच साहसी अनुभव देण्यासाठी आता अनोखे आकर्षण उभारले जात आहे. चंदीगडच्या धर्तीवर भूलभुलैय्या (Maze/Labyrinth) भवनाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. ‘वॉक-इन एव्हिएरी’समोरील मोकळ्या जागेत हा प्रकल्प साकारला जात आहे.
पर्यटकांना या भूलभुलैय्यातून फिरताना जंगलातील वातावरणाचा आभासी अनुभव घेता येणार आहे. वाढती पर्यटकसंख्या लक्षात घेऊन प्राणीसंग्रहालयात नवे आकर्षण निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे.