फेसबुकच्या झुकरबर्गची भाजपनेत्यावर टीका; काय आहे प्रकरण?

Kapil Mishra’s speech on CAA example of inciting violence says Zuckerberg
Kapil Mishra’s speech on CAA example of inciting violence says Zuckerberg
Updated on

नवी दिल्ली : फेसबूकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी भाजपनेते कपिल मिश्र यांच्या भाषणांवर टीका केली आहे. झुकरबर्ग यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांशी हेट स्पीचवरून संवाद साधला, यावेळी मार्क झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना फेसबूकच्या हेट स्पीच पॉलिसीविषयी समजवून सांगताना भाजप नेते कपिल मिश्रा यांच्या भाषणाचा दाखला दिला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मार्क झुकरबर्ग यांनी दिल्ली हिंसाचारादरम्यानच्या धमक्यांवरुन कपिल मिश्रा यांच्यावर टीका केल्याचे यातून स्पष्ट होत आहे. झुकरबर्ग यांनी मिश्र यांच्या भाषणाचा उल्लेख केला आहे. झुकरबर्ग आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीची एक ऑडिओ क्लिप लीक झाली आहे. कपिल मिश्र यांनी सीएए विरुद्धच्या आंदोलनाबाबत केलेल्या भाषणाचा उल्लेख झुकरबर्ग यांनी आपल्या २५ हजार कर्मचाऱ्यांना समजवताना केला. झुकरबर्ग यांनी कपिल मिश्रा यांचं नाव घेतलं नसलं, तरी ते भाषण हेट स्पीच असल्याचं सांगितलं आहे. दिल्लीमध्ये सीएए आंदोलनकर्त्यांबद्दल केलेलं हे भाषण हिंसा आणि दंगल भडकवण्यासारखं आहे, असं झुकरबर्ग म्हणाले.
-----------
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा 
-----------
सोनू सूदने मातोश्रीवर; उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा
-----------
'जर कोणी हिंसा वाढवणारी भाषा वापरत असेल, तर आपण याला पुढे नेऊ शकत नाही. आपल्याकडे आधीही अशी काही उदाहरणं आली आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आपण हटवल्या आहेत. भारतामध्येही अशा घटना घडल्या आहेत. जर पोलिसांनी लक्ष दिलं नाही, तर आमचे समर्थक गल्ल्या खाली करतील, असं बोललं गेलं. हे एकप्रकारे समर्थकांना प्रोत्साहन देण्यासारखं आहे. आपण हे भाषण फेसबूकवरून हटवलं,' असं झुकरबर्ग म्हणाले आहेत. 

दरम्यान, सगळ्यात आधी झुकरबर्ग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटचा उल्लेख केला. ट्रम्प यांनी अमेरिकेत सुरु असलेल्या #BlackLivesMatter आंदोलनाबाबत झुकरबर्ग यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट न हटवल्यामुळे कर्मचारी नाराज झाले होते. झुकरबर्ग यांनी ही पोस्ट फेसबूकवरून हटवण्याला मनाई केली होती. यानंतर मात्र ट्रम्प यांची पोस्ट अपमानजनक असल्याचं झुकरबर्ग म्हणाले. अमेरिकेतल्या जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर ट्रम्प यांनी केलेली ट्विटही वादात सापडली आहेत. ट्विटरनेही ट्रम्प यांची ही ट्विट हिंसेला चालना देणारी असल्याचं सांगत त्यांना फ्लॅग केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com