
नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाला शक्तिहीन करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार तपास संस्थांचा वापर करत आहेत, असा आरोप राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी रविवारी पत्रकार परिषदेमध्ये केला. त्याचप्रमाणे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) संबंधितांना स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबत बजावलेली नोटीस म्हणजे लोकशाहीचा अपमान असल्याचेही सिब्बल म्हणाले.