esakal | Punjab: कधीही नव्हती अशी सध्या काँग्रेसची स्थिती - कपिल सिब्बल
sakal

बोलून बातमी शोधा

Kapil Sibal

कधीही नव्हती अशी सध्या काँग्रेसची स्थिती - कपिल सिब्बल

sakal_logo
By
सुधीर काकडे

पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींमुळे काँग्रेसची अंतर्गत गटबाजी सध्या देशातील राजकारणाच्या चर्चेचा केंद्र बिंदू झाला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यापासून सुरुवात झालेल्या या राजकीय भुकंपांची मालिका काल नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यापर्यंत येऊन थांबली आहे. यावर प्रतिक्रीया देताना काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी आता महत्वाचे मत मांडले आहे.

काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी होणाऱ्या दिरंगाईबद्दल बोलताना त्यांनी कोणत्याही गोष्टीला वेळेच्या काही मर्यादा असतात, तसेच पक्ष कधीही नव्हता अशा परिस्थितीमधून जात असल्याचे सांगितले. काँग्रेसच्य जी-२३ नेत्यांच्या गटाच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आम्ही पक्ष सोडू इच्छित नाही असे सांगितले. अतिशय जड अंतकरणाने आपल्याला हे बोलावे लागते आहे. गौरवशाली इतिहास असणाऱ्या पक्षाचे आम्ही सदस्य आहोत, मात्र पक्ष सध्या ज्या परिस्थितीत आहे ती आम्ही पाहू शकत नाही. सिब्बल यांनी यावेळी पक्षाच्या नेतृत्वावर देखील नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: मोदी भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा संबंध तोडत आहेत - राहुल गांधी

माझा असा विश्वास आहे की, माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांपैकी एकाने कदाचित CWC बोलावण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांना लिहिले किंवा लवकरच देणार आहेत, जेणेकरून आम्ही या परिस्थितीत का आहोत? यावर संवाद होऊ शकेल असेही कपिल सिब्बल यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसमध्ये सध्या मोठी खळबळ सुरु असून, राज नव्या घडामोडी घडता आहेत. काल सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनात अनेक लोकांनी राजीनामे दिले आहेत. संध्याकाली काँग्रेस हायकंमांडने त्यांचा राजीनामा फेटाळल्याचे वृत्त समोर आले होते. तर अमरिंदर सिंग यांची नाराजी देखील पक्षासाठी घातक ठरु शकते असे चित्र निर्माण झाले आहे.

loading image
go to top