esakal | "मोदी भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा संबंध तोडत आहेत," राहुल गांधींचा पुन्हा निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul-Gandhi-Pm-Modi

मोदी भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा संबंध तोडत आहेत - राहुल गांधी

sakal_logo
By
अमित उजागरे

थिरुवअनंतपुरम : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. केरळमधील मलप्पुरम येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोदींवर सडकून टीका केली. मोदींबाबत आपली अडचण सांगताना राहुल गांधी म्हणाले, "भारताचा धर्मनिरपेक्षतेचा परस्पर संबंध ते तोडत आहेत."

राहुल गांधी भाजपला उद्देशून म्हणाले, "ते म्हणतात भारत एक राज्य आहे. आम्ही म्हणतो भारत म्हणजे इथले नागरिक आणि त्यांचे परस्पर संबंध आहेत. हे परस्पर संबंध हिंदू-मुस्लिमांमधील आहेत. तसेच हिंदु-मुस्लिम-शीख आणि तामिळ, हिंदी, उर्दू, बंगाली यांच्यातील आहेत. पंतप्रधानांसोबत माझी अडचण हीच आहे की, ते हे परस्पर संबंध तोडत आहेत."

"आज राजकीय सवाल विचारला जात आहे की, भारत काय आहे? जर तुम्ही सावरकरांसारख्या लोकांबाबत वाचलं तर ते सांगतात भारत हा भूगोल आहे. ते हातात पेन घेतात आणि भारताचा नकाशा रेखाटतात आणि सांगतात हा भारत आहे. म्हणजे काय तर या नकाशाच्या बाहेरचा भारत नाही", अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सावरकरांवरही टीका केली.

loading image
go to top