esakal | Kargil Vijay Diwas : कारगीलच्या पॉइंट 5353ची अनटोल्ड स्टोरी!
sakal

बोलून बातमी शोधा

Kargil Vijay Diwas

भारताने पाकच्या कब्जातील तळावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला पण भारतीय लष्कराला माघारी फिरावे लागले, असेही त्यांनी म्हटले होते. 

Kargil Vijay Diwas : कारगीलच्या पॉइंट 5353ची अनटोल्ड स्टोरी!

sakal_logo
By
सुशांत जाधव

जम्मू-काश्मीरमध्ये द्रास-कारगिल सेक्टरमध्ये मरपोला हिल हा भारत-पाक  देशांतील एक वादाचा मुद्दा आहे. हा पर्वत तब्बल 5353 मीटर उंच असून कारगिल युद्धाच्या दरम्यानच पाकिस्तानी सैन्याने 5353 पॉइंटवर कब्जा केल्याची बातम्या कारगिल युद्धानंतर झळकल्या होत्या. रणनीतिक आणि भौगोलिक दृष्टिने द्रास सेक्टरमधील पॉइंट-5353 ला खूप महत्त्व आहे. कारगिल युद्धादरम्यान भारतीय लष्कराने या पॉइंटवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. कारगिल युद्धात सहभागी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र यासंदर्भात वृत्त फेटाळून लावले होते. 

Kargil Vijay Diwas : कारगीलची शौर्यगाथा : लाखाची नोकरी सोडून विक्रम बत्रा झाले होते लष्करात दाखल

कारगिल विजय दिवसाला 21वर्षे पूर्ण झाली. या दोन दशकांच्या काळानंतरही द्रास सेक्टरमधील पॉइंट -5353 संदर्भात अस्पष्टता आहे. द्रासमधील हे क्षेत्र नियंत्रण रेषेवरील सर्वांत उंच ठिकण असून रणनितीक पातळीवर याला खूप महत्त्व असल्याचे मानले जाते. पॉइंट 5353 वर पाकिस्तानने कारगिरी युद्धापूर्वीच कब्जा केला होता. कारगिरच्या युद्धावेळी हे क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी कोणताही प्रयत्न झाला नव्हता, असे युद्धातील वरिष्ठ लष्कर अधिकारी सांगतात. पण हे क्षेत्र आपल्या हद्दीतील असून कारगिल युद्धादरम्यानच पाकिस्तान लष्कराने यावर कब्जा मिळवला असा दावा हिंदुस्तान टाइम्सचे पत्रकार प्रविण स्वामी यांनी केला होता. भारताने यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला पण भारतीय लष्कराला माघारी फिरावे लागले, असेही त्यांनी म्हटले होते. 

Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धातील काही साहसी आणि रंजक गोष्टी

मेजर नवनीत मेहता यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने  पॉइंट-5353 वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी लष्कर या क्षेत्राचा वापर तोफांच्या निगरानीसाठी केला होता. कारगिल युद्धादरम्यान 16 ग्रांडियर्स रेजिमेंटचे कर्नल पुष्पिंदर ओबरॉय हे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांनी अधिकृतरित्या पॉइंटवर चढाई करण्यासंदर्भातील संदेश पाठवल्याचे काही पुरावे देखील उपलब्ध आहेत. मेजर मेहतांनी एक नोट लिहून ठेवली होती. 18 मे 1999  पॉइंट-5353 वर ताबा मिळवण्याच्या खूप जवळ होतो. यात 13 जवान शहीद झाले. पाकिस्तानकडून सातत्याने आक्रमण सुरु असल्याने ही मोहिम थांबवावी लागली होती.  पॉइंट-5353 आपल्या हद्दत नाही आणि कारगिल युद्धावेळी त्यावर ताबा मिळवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही, असे सांगत लष्कराकडून हा दावा फेटाळून लावण्यात आला होता. 

loading image