Kargil Vijay Diwas : लवकरच थिएटर कमांड : राजनाथ सिंह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kargil Vijay Diwas rajnath singh announces setting up of joint theatre commands

Kargil Vijay Diwas : लवकरच थिएटर कमांड : राजनाथ सिंह

जम्मू : तिन्ही संरक्षण दलांच्या कार्यवाहीत अधिक समन्वय निर्माण व्हावा यासाठी संयुक्त थिएटर कमांड स्थापन करणार असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज सांगितले. तसेच, संरक्षण साहित्याचा सर्वांत मोठा आयातदार देश अशी ओळख बदलून या साहित्याचा निर्यातदार देश बनण्याकडे वेगाने वाटचाल सुरु असल्याचेही राजनाथसिंह यांनी सांगितले. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी जम्मू काश्‍मीर पीपल्स फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजनाथसिंह बोलत होते. कारगिल युद्धावेळी भारतीय लष्कर आणि हवाई दलाने संयुक्त मोहिम राबविली होती.

त्याचा संदर्भ देत राजनाथसिंह यांनी, अशा प्रकारच्या मोहिमा राबविण्यासाठी देशात संयुक्त थिएटर कमांड स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे सांगितले. संरक्षण साहित्याच्या निर्यातीत भारत आघाडी घेत असल्याचेही ते म्हणाले. ‘ भारत हा एकेकाळी सर्वांत मोठा संरक्षण साहित्याचा आयातदार होता. आता संरक्षण साहित्यांची निर्यात करणाऱ्या २५ देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारतातून सध्या १३ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याची निर्यात होत असून पुढील तीन वर्षांत तीन चाळीस हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे प्रयत्न असतील,’ असे राजनाथसिंह यांनी सांगितले. तिन्ही सैन्य दलातील अधिकाऱ्यांचा मिळून तयार केलेल्या विभागाला थिएटर कमांड म्हणतात.

पाकव्याप्त काश्‍मीरबाबत भारताच्या संसदेत प्रस्ताव मंजूर झाला होता. पाकव्याप्त काश्‍मीर हा भारताचा भाग होता, आहे आणि भविष्यातही राहिल. शिवस्वरुप बाबा अमरनाथ आमच्याकडे आणि शक्तीरुपातील देवी शारदा नियंत्रणे रेषेपलिकडे, असे कसे शक्य आहे?

- राजनाथसिंह, संरक्षण मंत्री

Web Title: Kargil Vijay Diwas Rajnath Singh Announces Setting Up Of Joint Theatre Commands

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..