

Marathi-speaking citizens in the Belagavi border region express concern over language rights amid Karnataka’s aggressive stance.
sakal
बेळगाव : भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती अस्मिता, संस्कृती आणि अस्तित्वाचे प्रतीक असते. मात्र सीमाभागातील मराठी भाषकांसाठी हीच भाषा आज संघर्षाचे कारण ठरत आहे. केरळ विधानसभेने मंजूर केलेल्या ‘मल्याळम् भाषा विधेयका’च्या विरोधात कर्नाटक सरकार आक्रमकतेने उभे राहिली आहे, मात्र, बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषकांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र सरकार अशीच ठाम आणि आक्रमक भूमिका का घेत नाही?, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.