बंगळूर : इटालियन लक्झरी ब्रँड ‘प्राडा’मध्ये (Prada Controversy) मॉडेल कोल्हापुरी चप्पल (Kolhapuri Chappal) वापरल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांनी भर दिला की, महाराष्ट्रातील कोल्हापुरात उपलब्ध असलेल्या या चप्पलांच्या निर्मितीमध्ये कर्नाटकातील कारागिरांचाही मोठा वाटा आहे. या प्रतिष्ठित चप्पल बनवणाऱ्या कर्नाटकातील कारागिरांची नावे, काम आणि वारसा जपला पाहिजे.