कर्नाटकात 12 जागा मिळवत भाजपची जोरदार मुसंडी; कॉंग्रेसला मिळाल्या 11 जागा l Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp-flag

कर्नाटकात 12 जागा मिळवत भाजपची जोरदार मुसंडी; कॉंग्रेसला मिळाल्या 11 जागा

बंगळूर : विधान परिषदेच्या २५ जागांच्या निवडणुकीची मंगळवारी (१४) मतमोजणी करण्यात आली. सत्ताधारी भाजपने १२ जागा जिंकल्या, तर कॉंग्रेसने ११ व धजदला केवळ एकच जागा जिंकता आली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला धक्का बसला असून विद्यमान सदस्य महांतेश कवठगीमठ यांचा पराभव झाला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी व अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांचा विजय झाला आहे.

कॉंग्रेसने १५ पैकी चार जागा तर धजदने आपल्या चारपैकी तीन जागा गमवल्या आहेत. काँग्रेससाठी चांदीचा अस्तर म्हणजे मंड्यातील धजदच्या जागेवर कॉंग्रेसने विजय मिळविला. या निकालामुळे ७५ सदस्यीय परिषदेत भाजपची संख्या आता ३८ वर जाणार आहे. तर काँग्रेसची संख्या २९ वरून २५ वर आली आहे. धजदचे संख्याबळ ९ वर घसरले आहे. यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल आणि वरिष्ठ सभागृहातून विधेयके पुढे नेण्यासाठी धजदवरील त्यांचे अवलंबित्व संपुष्टात येईल.

हेही वाचा: जगात भारी कोल्हापुरी! लीना नायर बनल्या फ्रान्सच्या Chanel कंपनीच्या CEO

विधान परिषदेचे विद्यमान अध्यक्ष बसवराज होराट्टी यांनाही आता भाजप विस्थापित करू शकते. होरट्टी धजदचे सदस्य आहेत. माजी पंतप्रधान देवेगौडांच्या कुटुंबातील त्यांचे आणखी एक नातू आणि माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांचा मुलगा सूरज रेवण्णा विधान परिषदेत नवीन सदस्य असतील. हसन विधानपरिषद मतदार संघातून ते विजयी झाले आहेत.

बळ्ळारीमध्ये आश्चर्यकारक निकाल लागला. जिथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासाठी १९९९ मध्ये बळ्ळारी संसदेची जागा सोडणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते के. सी. कोंडय्या यांचा पराभव झाला आहे. बंगळूर शहरी भागात काँग्रेसचे करोडपती उमेदवार युसूफ शरीफ (ज्यांनी १,७४३ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती) त्यांचा पराभव झाला.

हेही वाचा: आपण मजूर आहात का? सहकार विभागाची दरेकरांना नोटीस

विजयी उमेदवार

 • म्हैसूर-चामराजनगर*डॉ. डी. थिम्मय्या (काँग्रेस)

 • दक्षिण कन्नड (द्विसदस्य) - कोटा श्रीनिवास पुजारी (भाजप), मंजुनाथ भंडारी (काँग्रेस)

 • चित्रदुर्ग-दावणगेरे - के. एस. नवीन (भाजप)

 • शिमोगा - डी. एस. अरुण (भाजप)

 • बेळगाव(द्विसदस्य) - चन्नराज हट्टीहोळी (काँग्रेस), लखन जरकीहोळी (अपक्ष)

 • बंगळूर - गोपीनाथ रेड्डी (भाजप)

 • कोडगू - सुजा कुशलप्पा (भाजप)

 • उत्तर कन्नड - गणपती उळ्वेकर (भाजप)

 • गुलबर्गा - बी. जी. पाटील (भाजप)

 • बळ्ळारी - वाय. एम. सतीश (भाजप)

 • धारवाड - (द्विसदस्य) प्रदीप शेट्टर (भाजप), सलीम अहमद (काँग्रेस)

 • विजापूर - (द्विसदस्य) पी. एच. पूजा (भाजप), सुनिल गौडा पाटील (काँग्रेस)

 • मंड्या - एम. जी. गुळीगौडा (काँग्रेस)

 • रायचूर - शरनगौड बय्यापूर

 • बिदर - भीमराव पाटील (काँग्रेस)

 • कोलार - अनिल कुमार (काँग्रेस)

 • बंगळूर ग्रामीण - एस. रवी (काँग्रेस)

 • तुमकूर - आर. राजेंद्र (कॉंग्रेस) एन.

 • हसन - सूरज रेवण्णा (धजद)

Web Title: Karnataka Assembly Council Election 2021 Bjp Won 12 Seats And Congress 11 Seats

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KarnatakaBjpCongress