Karnataka Election : म. ए. समितीचं विरोधकांसमोर कडवं आव्हान; निवडणुकीत किती जागा जिंकणार?

मराठी भाषिकांचे महाराष्ट्रात जाण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी समिती गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देत आहे.
Karnataka Election
Karnataka Election sakal
Summary

बेळगाव ग्रामीण, दक्षिण, उत्तर मतदारसंघासह खानापूर मतदारसंघातही समितीने निकराने लढा दिला आहे. मतदानही चांगले झाल्याने कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

बेळगाव : सीमालढ्याचा एक भाग म्हणून विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Election 2023) लढविणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने यावेळी निकराने लढा दिल्‍याची चर्चा आहे. त्‍यामुळे समितीच्‍या विजयाच्‍या आशा पल्‍लवित झाल्‍या आहेत. गेले महिनाभर समिती कार्यकर्ते व मराठी भाषिकांनी घरदार विसरुन रात्रंदिवस समितीसाठी काम केले. त्यामुळे समितीला विरोधकांसमोर कडवे आव्हान उभे करण्यात यश आले.

Karnataka Election
Shiv Sena Political Crisis : उद्धव ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाणांचं ऐकलं असतं तर, निकाल वेगळा लागला असता!

भाषावार प्रांतरचना झाल्यापासून मराठी भाषिकांवरील अन्याय दूर व्हावा. मराठी भाषिकांचे महाराष्ट्रात जाण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी समिती गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देत आहे. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुका समितीने (Maharashtra Ekikaran Samiti) लढविल्या आहेत. अनेकदा यश-अपयश आले, तरी लढ्याची धार अजूनही कायम असल्याचे समितीने वेळोवेळी दाखवून दिले आहे. त्यामुळे समितीने यावेळी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता.

Karnataka Election
Karnataka Election : बोहल्यावर चढण्याआधी बजावले राष्ट्रीय कर्तव्य; 'या' नववधूच्या निर्णयाची गावात चर्चा

सुरुवातीपासूनच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

सुरुवातीपासूनच कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण, खानापूर व यमकनमर्डी मतदारसंघात समितीने एकच उमेदवार जाहीर केला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी समितीच्या उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत मतदारसंघ पिंजून काढले. मतदानादिवशीही समितीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात आले. अनेक कार्यकर्ते सकाळपासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते.

Karnataka Election
Sangola : आमदार रवींद्र धंगेकरांचा सत्कार शरद पवारांच्या हस्ते का झाला? राजकीय चर्चांना उधाण

कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित

बेळगाव ग्रामीण, दक्षिण, उत्तर मतदारसंघासह खानापूर मतदारसंघातही समितीने निकराने लढा दिला आहे. मतदानही चांगले झाल्याने कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गुरुवारी दिवसभर कार्यकर्ते समितीला कोणत्या प्रभागात किंवा कोणत्या गावात किती मतदान झाले आहे, याची माहिती करुन घेत आकडेमोड करण्यात गुंतल्याचे दिसून आले. समितीच्या कार्यालयातही कार्यकर्त्यांची लगबग दिसून येत होती. मतदान झाल्यानंतर आता कार्यकर्त्यांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे. शनिवारी (ता. १३) मतमोजणी होणार असून समिती कार्यकर्त्यांमध्ये निकालाची उत्सुकता आहे.

एकीमुळे वाढले बळ

महाराष्ट्र एकीकरण समितीला दोन गट निर्माण झाल्याचा फटका गेल्या विधानसभा निवडणुकीत बसला होता. मात्र, यावेळी सर्वच मतदारसंघात एकी झाली. मतदारसंघात एकच उमेदवार देण्यात आल्याने समितीला बळ मिळाल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. अशाच प्रकारची एकी सर्व मतदारसंघात यापुढेही कायम ठेवली जावी, असे मत कार्यकर्त्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com