Karnataka Election : मतांसाठी पंतप्रधान मोदींनी हिंदू-मुस्लिम धर्मियांत फूट पाडली; काँग्रेस अध्यक्षांचा गंभीर आरोप

आम्ही देशाच्या पंतप्रधानांचा (Narendra Modi) अपमान करत नाही.
Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Election 2023esakal
Summary

कोणी कितीही प्रयत्न केले तरी कल्याण कर्नाटकातील जातीय सलोखा त्यांना बिघडवता आलेला नाही.

बंगळूर : आम्ही देशाच्या पंतप्रधानांचा (Narendra Modi) अपमान करत नाही, तर पंतप्रधानांकडून कर्नाटकाचा अपमान केला जात आहे, असे म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पलटवार केला आहे.

गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद येथे काँग्रेस (Congress) उमेदवाराच्या प्रचारादरम्यान बोलताना ते म्हणाले, ‘‘राज्यातील ४० टक्के कमिशनमुळे सरकारी कामांचा दर्जा बिघडला आहे. प्रत्येक कामात लाचखोरी आहे. ४० टक्के रक्कम गमावल्यानंतर सामान्य लोक संतापले आहेत. ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणारे मोदी यांनी जनतेचा ४० टक्के पैसा का वाया घालविला, याचा जाब आपले मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांना विचारावा.’’

Karnataka Assembly Election 2023
Karnataka Election : 'बजरंगबली की जय'च्या घोषणेनं मोदींची भाषणाला सुरुवात; म्हणाले, 'यांच्या'पासून सावध राहा

ते पुढे म्हणाले, ''राज्यातील विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Election 2023) जनतेने काँग्रेसला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोदी सहा, आठ वेळा जिल्ह्याचा दौरा करत आहेत. माझा, मुलगा प्रियांक त्यांचा अपमान केल्याचा दावा पंतप्रधान करत आहेत. देशाच्या पंतप्रधानांचा आपण कसा अपमान करू शकतो, तो कोणीही असो, पंतप्रधान आपलाच आहे. तुम्ही कर्नाटकचा अपमान करत आहात. तुम्ही राज्यासाठी काय योगदान दिले ते आधी सांगा.''

Karnataka Assembly Election 2023
Karnataka Election : विश्‍वासघाताची किंमत भाजपला लागली चुकवावी; नऊ वर्षांत बदलले चार मुख्यमंत्री

आम्ही गुलबर्गा येथे केंद्रीय विद्यापीठ स्थापन केले. आम्ही ईएसआय हॉस्पिटलचा विकास केला आहे. भाजपच्या राजवटीत त्याचे गोठ्यात रुपांतर झाले. पंतप्रधानांनी हिंदू-मुस्लिम धर्मियांत फूट पाडली. कोणी कितीही प्रयत्न केले तरी कल्याण कर्नाटकातील जातीय सलोखा त्यांना बिघडवता आलेला नाही. समाजात फूट पडली तर मतांच्या दृष्टीने फायदा होईल, असा बाहेरच्यांचा अंदाज आहे, असेही खर्गे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com