कर्नाटकात राजकीय वातावरण तापलं; लवकरच मंत्रिमंडळात होणार फेरबदल I Karnataka | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

JP Nadda Basavaraj Bommai

विधानसभा निवडणुकीपूर्वीच कर्नाटकातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालीय.

कर्नाटकात राजकीय वातावरण तापलं; लवकरच मंत्रिमंडळात होणार फेरबदल

विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Karnataka Assembly Election) कर्नाटकातील (Karnataka) राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालीय. त्यातच आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी 2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याचं आवाहन केलंय. यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी लागलीच बैठक बोलवली. आज (सोमवार) बोम्मई यांनी सांगितलं की, 'भाजप हाय कमांड लवकरच मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदलाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसंच जेपी नड्डा यांनी नवी दिल्लीत बैठक होणार असल्याचंही सांगितलंय, त्यामुळं राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.' सीएम बोम्मई यांनी 6 एप्रिलला नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली होती.

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं केएस ईश्वरप्पा यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी आणि कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आल्यानं फेरबदलाचं वारं वाहू लागलंय. बोम्मई पुढं म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं नेतृत्व भाजपसाठी एक मोठी शक्ती आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या कल्याणकारी योजनांखाली आपण पुढं जात आहोत, असं त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा: चंद्रकांतदादांना हिमालयापर्यंत मी सोडायला जाईन : जयंत पाटील

यावेळी बोम्मईंनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्ला चढवला. सर्वात जुन्या पक्षाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असं त्यांनी म्हंटलंय. कर्नाटकात वर्षभरानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून नड्डा यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जनतेपर्यंत पोहोचून केंद्रात आणि राज्यातील भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील सरकारनं केलेल्या चांगल्या कामांबद्दल जागरुकता निर्माण करण्यास सांगितलंय.

Web Title: Karnataka Assembly Election Cm Basavaraj Bommai Hints At Cabinet Reshuffle After Jp Nadda Visit To Karnataka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top